उत्तर पूर्व मुंबई लोकसभा निवडणूक 2019

शनिवार, 4 मे 2019 (14:54 IST)
मुख्य लढत : मनोज कोटक (भाजप) विरुद्ध संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी-अमराठी मतांचा मेळ घालण्यासाठी मनोज कोटक यांचं नाव पुढे करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत कोटक मुलुंडमधून निवडून आले आहेत. सध्या महापालिकेत भाजपचे गटनेतेपदी आहेत. मनोज कोटक यांचा मुलुंड आणि भांडूप परिसरात चांगला जनसंपर्क आहे. मनोज कोटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दोन वेळा कोटक यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न केला होता. महापालिका निवडणुकीत मनोज कोटक हे सलग तीन वेळा मुलुंड मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती