विद्यार्थी शिक्षक मराठी जोक
बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (19:32 IST)
1 मास्तर आणि पक्याची माहिती
मास्तर वर्गात मुलांना व्याकरणाचा तास घेताना
मास्तर - मुलांनो सांगा त्याने भांडी घासली...
आणि त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे...?
पक्या - अहो मास्तर, पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे.
मास्तरचे डोळे भरून आले...!!!
त्यांना विचारच पडला पक्याला एवढी माहिती
मिळाली तरी कुठून !
2 सरांसाठी चष्मा
डॉक्टर - चष्मा कोणासाठी बनवायचा आहे?
बबलू - आमच्या शाळेतील सरांसाठी.
डॉक्टर - पण का?
बबलू- कारण ते मला नेहमी गाढव म्हणून म्हणतात.
3 गोट्याची परीक्षा आणि मास्टर
परीक्षेमध्ये पेपर खूप कठीण असतो आणि
मास्तर पण खूप कडक असतात.
कॉपी पण करता येत नसते.
शेवटच्या बेंचवर बसलेल्या
गोट्याने परीक्षकाला एक चिट्ठी दिली.
परीक्षकाने चिट्ठी वाचली आणि
चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गोट्या च्या पुढे बसलेल्या मित्राने विचारले
“यार तू काय लिहिलं होतं त्या चिट्ठीत?”
गोट्या म्हणाला, “मी लिहिलं होतं
– सर, तुमची पॅन्ट मागून फाटली आहे”
4 बंडू अभ्यासात कमजोरच होता,
मित्रांसोबत नेहमी मस्ती करायचा
मास्तर- तुला इंग्रजीत इतके कमी मार्क का मिळाले?
बंडू - मास्तर, त्या दिवशी पक्या आला नाही ना?
मास्तर- पक्या आणि पेपरचा काय संबंध ?
बंडू - माझ्या शेजारचा पक्या आला नाही.
म्हणून मला मार्क कमी पडले
मास्तरांनी बंडूला वर्गाबाहेर केलं.
Edited By - Priya Dixit