गुजरात जायंट्सने PKL 8 मधील 14 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत. 3 सामने बरोबरीत संपले आहेत. ते 38 गुणांसह गुणतालिकेत 11व्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सने त्यांचे शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि तीच गती कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे पाटणा पायरेट्सने 14 पैकी 9 सामने जिंकले असून 4 सामने जिंकले आहेत. त्यांचा एक सामना बरोबरीत राहिला असून ते 50 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. पाटणा पायरेट्सने गेल्या सामन्यात जबरदस्त विजय नोंदवला होता.
गुजरात जायंट्स संघ -अजय कुमार, परदीप कुमार, हादी ओश्तारक, गिरीश मारुती एरनाक, राकेश, परवेश भैंसवाल आणि सुनील कुमार.
पाटणा पायरेट्स संघ - गुमान सिंग, सचिन तन्वर, प्रशांत कुमार राय, नीरज कुमार, सुनील, मोहम्मदरेझा चियाने आणि सी साजिन.