Youtube झाले 9 वर्षाचे

मंगळवार, 29 एप्रिल 2014 (17:02 IST)
यू-टय़ूब शिवाय आज आपण इंटरनेट, स्मार्टफोनची कल्पनाच करू शकत नाही. मात्र यू-टय़ूबला ही प्रगती काही एका दिवसांत नाही तर गेल्या नऊ वर्षात मिळालीय. यू-टय़ूबवर पहिला व्हिडिओ अपलोड झाला, त्याला आज नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत.‘ Me at the‘ नावानं असलेला हा व्हिडिओ यूटय़ूबचे सहसंस्थापक जावेद करीम यांनी 23 एप्रिल 2005 ला अपलोड केला होता. आतापर्यंत या व्हिडिओला एक कोटी 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. अवघ्या 19 सेकंदांच्या या व्हिडिओत करीम सॅन डिएगो शहरातील एका प्राणिसंग्रहालयाबाहेर उभा आहे. एका हत्ती समोर उभं राहून ते म्हणतायेत, या प्राण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची सोंड खूप खूप लांब होते.

2010 मध्ये द टोलेडो ब्लेडनं याबद्दल एक संपादकीय छापलं होतं. त्यात सांगण्यात आलं होतं की या व्हिडिओला करीम यांचा शालेय मित्र याकोव लापित्स्कीनं रेकॉर्ड केलं होतं. आता ते टोलेंडो विद्यापीठात केमिकल आणि पर्यावरण इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत. 

वेबदुनिया वर वाचा