रेल्वेच्या अॅपवरून विमानाचे तिकीट बुकिंग

बुधवार, 12 जुलै 2017 (11:51 IST)

रेल्वे मंत्रालय नवीन मोबाईल अॅप लॉन्च करणार आहे. या अॅपच्या माध्यमातून विमानाचं तिकीटही बुक करता येणार आहे. प्रवशांना वेगवेगळ्या सुविधांसाठी अत्यंत मदतीचं असं हे अॅप ठरेल. अॅपचं नाव अद्याप समोर आले नाही.

रेल्वे मंत्रालयतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, CRIS कडून हे अॅप विकसित केले जाणार आहे. हे बनवण्यासाठी सात कोटी रुपयांचा खर्च लागण्याचा अंदाज आहे.

रेल्वेच्या प्रवासादरम्यान स्वच्छता किंवा प्रवाशांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी अॅप आहेत. मात्र, एक अॅप एकच सेवा उपलब्ध करुन देतं. सर्वच सेवा एकाच अॅपवर असण्याची गरज अनेकदा प्रवाशांनी व्यक्त केली होती. त्यामुळे रेल्वेचं हे नवं अॅप खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

ट्रेन संबंधित सेवांसोबतच टॅक्सी, हॉटेल आणि विमान तिकीट बुकिंगही या अॅपवरुन करु शकता. अशाप्रकारचं अॅप बनवण्याची घोषणा भारतीय रेल्वेने अर्थसंकल्पातच केली होती.

वेबदुनिया वर वाचा