Whatsapp मध्ये येणार आहे महत्त्वाचा फीचर, तुम्ही त्यावर सामान खरेदी करू शकता !

गुरूवार, 2 मे 2019 (12:36 IST)
आता तुम्ही मेसेजिंग एप व्हाट्सएप (Whatsapp)वर सामान देखील खरेदी करू शकता. व्हाट्सएपवर यूजरला आपले आवडते ब्रँड आणि बिझनेस वर  शॉपिंग करण्याचा फीचर मिळणार आहे. याची घोषणा फेसबुकने एफ8 एनुअल डेवलपर कॉन्फ्रेंसमध्ये दिली.
 
फेसबुकने सांगितले की तो कशा प्रकारे व्हाट्सएपला बिझनेससाठी उत्तम बनवण्याची योजना आखत आहे. तसेच फेसबुकने मेसेंजर एपचा डेस्कटॉप वर्जन देखील लॉचं केला आहे, तो या वर्षाच्या शेवटी विंडोज आणि मेक ओएससाठी उपलब्ध होईल.
 
फेसबुकचे म्हणणे आहे की, 'या फीचरच्या मदतीने बिझनेस आपले काम ग्राहकांपर्यंत पोहोचवेल बलकी त्यांची आवड देखील जाणून घेईल. हे पाहणे फारच महत्त्वाचे होईल की व्हाट्सएपवर हे फीचर कशाप्रकारे काम करेल आणि सध्या होत असलेल्या टेस्टिंगनंतर या वर्षाच्या शेवटपर्यंत हे फीचर तुमच्या एपमध्ये जोडण्यात येईल. फेसबुक येणार्‍या काळात बरेच बिझनेस संबंधी फीचर मेसेजिंग एपमध्ये आणणार आहे आणि व्हाट्सएप पेमेंट्स देखील आधिकारिकरीत्या लवकरच लॉचं होऊ शकते. फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी काही दिवसांअगोदर असे सांगितले होते की, 'आमचा एक टेस्ट फीचर भारतात व्हाट्सएप (पेमेंट्स) साठी सुरू आहे.'
 
आवडीच्या उत्पादाची निवड करू शकता : व्हाट्सएपवर सरळ शॉपिंग फीचरचे जेथे बरेच यूजर वाट बघत आहे, तेव्हा फेसबुकने एक विकल्प आणला आहे ज्याच्या मदतीने बिझनेस आपले उत्पाद कॅटलॉग व्हाट्सएप चॅटमध्ये एड करू शकतील. नवीन फीचरसोबत, व्हाट्सएप यूजर्स एखाद्या बिझनेस ब्रँडसोबत चॅट करून त्याचा कॅटलॉग बघू शकतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती