केनच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की व्हाट्सएप भारतात यूपीआयच्या माध्यमाने पुढील 6 महिन्यात पेमेंट सर्विस सुरू करू शकतो. येथे महत्त्वाचे म्हणजे व्हाट्सएपने पेमेंट सिस्टमसाठी लोकप्रिय डिजीटल वॉलिट्सची निवड न करत यूपीआयची निवड केली आहे. केनने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या संदर्भात लिहिले आहे की व्हाट्सएपने आधी डिजीटल वॉलेटबद्दल विचार केला होता, पण 20 मार्चला आरबीआयची गाइडलाइन्स आल्यानंतर व्हाट्सएप यूपीआय वर दावा लावण्याचा इच्छुक आहे.