नकोसे ग्रुप टाळण्यासाठी व्हॉट्‌सअ‍ॅपचे नवे फीचर

सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (11:36 IST)
इच्छेविरोधात एखाद्या नव्या व्हॉट्‌सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडले गेल्याने होणार्‍या मनस्तापापासून लवकरच सुटका होणार आहे. व्हॉट्‌सअ‍ॅपने देऊ केलेल्या एका नव्या फीचरमुळे अनाहूतपणे ग्रुप सदस्य होण्याची डोकेदुखी थांबणार आहे. या नव्या वैशिष्ट्यानुसार एखाद्या नव्या ग्रुपमध्ये आपल्याला कोणी समाविष्ट करावे, याबाबतचे अधिकार व्हॉट्‌सअ‍ॅपने थेट यूजरला दिले आहेत.
 
यानुसार प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन नोबडी, माय कॉण्टॅक्टस अथवा एव्हरीवन या पर्यायांपैकी एका पर्यायाची यूजरला निवड करता येईल. आपल्या संमतीशिवाय कोणत्याही ग्रुपशी जोडले जाण्यास इच्छुक नसणार्‍या यूजरनी यातील नोबडी या पर्यायावर क्लिक केल्यास संभाव्य डोकेदुखीपासून सुटका होऊ शकेल. हे वैशिष्ट्य व्हॉट्‌सअ‍ॅप बेटावर दाखल होणार असून त्यानंतर व्हॉट्‌सअ‍ॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये ते उपलब्ध केले जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती