WhatsApp, लवकरच दोन शानदार फीचर्स घेऊन येत आहे

शुक्रवार, 24 जुलै 2020 (14:51 IST)
लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपकडून (Whatsapp multiple device feature spotted in latest beta version)आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणले जातात. आता पुन्हा एकदा कंपनी दोन शानदार फीचर्स घेऊन येत आहे.
 
एकच व्हॉट्सअॅटप अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता यावं या फीचरवर WhatsApp कडून दीर्घ काळापासून काम सुरू आहे. आता लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाण्याची शक्यता आहे. या फीचरद्वारे युजर्सना एकाच व्हॉट्सअॅ्प अकाउंटचा वापर अनेक डिव्हाइसवर करता येणार आहे.
 
WhatsApp चे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपने एक नवीन अँड्रॉइड बीटा अपडेट जारी केलं आहे. Android साठी या लेटेस्ट व्हॉट्सअॅ्प v2.20.196.8 अपडेटमध्ये दोन नवीन फीचर्स आहेत. यात अॅडव्हान्स सर्च मोड आणि मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट यांचा समावेश आहे.
 
एक व्हॉट्सअॅ‍प अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता येईल अशा मल्टीपल डिव्हाइस सपोर्ट या फीचरवर कंपनीकडून दीर्घ काळापासून काम सुरू (Whatsapp multiple device feature spotted in latest beta version)होतं. WABetaInfo ने व्हॉट्सअॅपच्या v2.20.196.8 Beta या अपडेटमधील नवीन फीर्सबाबतची माहिती दिली आहे. यानुसार, मल्टिपल डिव्हाइस सपोर्टसाठी ‘ ‘Linked Devices’ नावाचं एक वेगळं सेक्शन देण्यात आलं आहे.