WhatsAppने वापरकर्त्यांना दिलेला महत्त्वाचा सल्ला - या एका चुकीमुळे बैन होऊ शकतं अकाउंट

मंगळवार, 14 जुलै 2020 (13:58 IST)
हॅ़किंग आणि फसवणुकीबाबत व्हॉट्सऐपविषयीची माहितीही सतत समोर येत आहे. हे लक्षात घेऊन व्हॉट्सऐप यूजर्सना एक महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला आहे WABetaInfoने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केले आहे, ज्यात व्हॉट्सऐपचे मॉडिफाइड वर्जन वापरण्यास वापरकर्त्यांना मनाई आहे.
 
WABetaInfoने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'व्हॉट्सऐपची सुधारित आवृत्ती सिक्योरिटी आणि गोपनीयतेसाठी कधीही चांगला उपाय असू शकत नाही' त्यासोबतच एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे की मॉडिफाइड वर्जन वापर केल्याने फेक वाट्सऐप डिवेलपर्स सहजरीत्या MITM अटॅक (man in the middle)च्या माध्यमाने मजकूर सहज बदलू आणि संपादित करू शकतात.
  
एवढेच नव्हे तर वॉर्निंगमध्ये असेही सांगितले गेले की कंपनीने व्हॉट्सअॅपच्या सुधारित व्हर्जनची पडताळणी केलेली नाही. तर जर एखादा वापरकर्ता त्यांचा वापर करत असेल तर त्याच्या व्हॉट्सऐनप अकाउंटवरही बंदी येऊ शकते.
 
त्यात पुढे असेही लिहिले आहे की ओरिजनल व्हॉट्सऐपच्या तुलनेत या मॉडिफाइड वर्जनमध्ये २० पेक्षा जास्त नवीन वैशिष्ट्ये आहेत, परंतु या लोभामध्ये जोखीम घेतल्याने आपली गोपनीयता व सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता देखील आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती