बाप्परे, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम बंद होणार ?

शुक्रवार, 9 मार्च 2018 (10:52 IST)

व्हॉट्सअॅप हे मेसेंजर अॅप धोक्यात आहे. कारण  ब्लॅकबेरीने फेसबुकवर एक केस दाखल केली आहे. यामध्ये ब्लॅकबेरीने फेसबुकवर मॅसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसाठी आपली टेक्नोलॉजी चोरल्याचा आरोप केला आहे. ब्लॅकबेरीने दावा केलाय की, ही त्यांची पेटेंट टेक्नोलॉजी आहे. ब्लॅकबेरीच्या मते, फेसबुक इंस्टन्ट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये ब्लॅकबेरीच्या टेक्निकचा प्रयोग करत आहे.


आता ब्लॅकबेरीने दावा केलाय की, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे ब्लॅकबेरीतर्फे डेव्हलप करण्यात आलेल्या टेक्निकचा वापर करत आहे. इतकचं नाही तर, ब्लॅकबेरीने म्हटलयं की, फेसबुकने आमच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीची चोरी केलीय. त्यामुळे फेसबुक मॅसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामला बंद करावे.

ब्लॅकबेरीतर्फे आता कुठल्याच प्रकारची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये. मात्र, कंपनीला आर्थिक नुकसान भरपाई हवी आहे. ब्लॅकबेरीच्या मते, फेसबुकने त्यांचे अनेक फिचर्स चोरी केली आहेत. या प्रकरणात फेसबुकचे डेप्युटी जनरल काऊंसिल पॉल ग्रेवान यांनी म्हटलयं की, ब्लॅकबेरीने नवं काही तंत्रज्ञान शोधण्याऐवजी दुसऱ्यांच्या संशोधनावर टॅक्स लावण्याचा विचार करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती