WhatsApp वर लागोपाठ मेसेज पाठवत असाल तर बंद होईल आपलं अकाउंट
जगातील सर्वात फास्ट इंस्टेंट मेसेजिंग सर्व्हिस प्रदान करणारी कंपनी व्हाट्सअॅपने मोठ्या प्रमाणात संदेश पाठवणार्यांविरुद्ध मोठा निर्णय घेतला आहे. व्हाट्सअॅप आता अशा लोकांचं अकाउंट बंद करेल जे दररोज लागोपाठ मेसेज पाठवत असतात.
कंपनी अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करू शकते. जाणून घ्या याबद्दल...
व्हाट्सअॅपने आपल्याला ब्लॉगमध्ये म्हटले आहे की कंपनी अशा लोकांचे व्हाट्सअॅप अकाउंट बंद करेल जे बल्क (मोठ्या प्रमाणात) इतर लोकांना मेसेज पाठवतात. याची सुरुवात 7 डिसेंबर 2019 पासून सुरू होणार. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले की-
व्हाट्सॅपवर 90 टक्के मेसेज खासगी असतात परंतू मागील काही वर्षांपासून बल्क मेसेजेसच ट्रेड सुरू झाले आहे.
बल्क मेसेजमध्ये सर्वात जास्त सर्व राजकीय पक्ष आणि डिजीटल मार्केटिंग करणार्यांचे मेसेज असतात. अशाच प्रकारे दररोज मोठ्या प्रमाणात बोगस बातम्या शेअर केल्या जातात. म्हणूनच व्हाट्सअॅपचे हे पाऊल बल्क मेसेज आणि फेक न्यूज थांबविण्यासाठी काम करेल
जाणून घ्या किती मेसेज केल्यावर होईल नियमांचे उल्लंघन
व्हाट्सअॅपप्रमाणे एखाद्या अकाउंटहून 15 सेकंदात 100 मेसेज पाठवले जात असतील तर त्या अकाउंटला बल्क मेसेजचा दोषी मानले जाईल आणि त्याचे अकाउंट बंद करण्यात येईल.
तसेच अकाउंट बनल्यावर लगेच अर्थात 5 मिनिटाच्या आत अनेक मेसेज पाठवायला सुरुवात झाल्यास कंपनी त्या विरुद्ध कारवाई करेल.
कंपनी असे अकाउंट्स देखील बंद करेल जे काही वेळापूर्वी उघडले असून त्या अकाउंटवरून अनेक समूह तयार केले जात असतील. जसे आपण एक अकाउंट उघडल्यावर लगेच त्या अकाउंटवरून अनेक ग्रुप्स तयार करायला सुरू केल्यास कंपनी त्यावर कारवाई करेल.
या प्रकारे कंपनीला एखाद्या उद्देशाने अकाउंटवर होत असलेल्या क्रियाकलाप बघून अकाउंट बंद करता येईल. कारण इंस्टेट मेसेज सर्व्हिस असल्यामुळे या सेवेद्वारे काही सेकंदातच फेक बातम्या हजारो लोकांपर्यंत पोहचून त्या फारवर्ड केल्या जातात. फेक न्यूजवर ताबा ठेवण्यासाठी यापूर्वी देखील बदल करण्यात आले असून कंपनी सातत्याने यावर लक्ष घालत असते.