मोबाईल वापरत असलेला प्रत्येक व्हॉट्सअॅप वापरतो मात्र आता एक बातमी आहे ज्यामध्ये
वर्षाअखेर अर्थात ३१ डिसेंबर नंतर काही फोनवर काम करणं बंद करणार आहे. यामध्ये आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप चालणार नाही. व्हॉट्सअॅप ने एका ब्लॉगद्वारे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत. व्हॉट्सअॅप जुन्या मोबाईलवर चालणार नाही. या फोनमध्ये ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी 10, विंडोज फोन 8.0 आणि जुन्या व्हर्जनचा समावेश केला आहे. हा निर्णय कंपनीसाठी कठोर आहे. मात्र व्हॉट्सअॅपचा आणखी चांगला अनुभव देण्यासाठी ही अपडेट दिली आहे. या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही नोकिया सिम्बियन S60, ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी, विनडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स, नोकिया S40, अँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स, हे सर्व फोन आहेत. त्यामुळे तुमचा फोन तपासून घ्या नाहीतर व्हॉट्सअॅप वापरणे बंद होईल.