प्रायव्हसी आणि सुरक्षिततेसाठी फेसबुकचे नवे टूल

मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (11:12 IST)
युजर्सच्या प्रायव्हसीचा आणि सुरक्षिततेचा विचार करून फेसबुकने एक नवीन टूल लॉन्च केले आहे. फेसबुक युजर्सच्या फोटोचा दुरूपयोग टाळण्यासाठी हे नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला टॅग केल्याशिवाय फोटो अपलोड केल्यास किंवा प्रोफाईल फोटो सेट केल्यास याची सुचना ताबडतोब देण्यात येईल. 
 
फेसबुकचे सुरक्षा अधिकारी एंटिगोन डेविसने सांगितले की, त्रास देण्यासाठी लोक फेक आयडीचा वापर करतात. युजरने ब्लॉक केलेल्या फेक अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट किंवा मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केल्यास हे टूल युजरला तशी सुचना देणारआहे. याव्यतिरिक्त फेसबुकने अजून एक टूल लॉन्च केले आहे. ज्यामुळे ब्लॉक केल्याशिवाय ही तु्म्ही असे मेसेज दुलर्क्षित करू शकता. यामुळे मेसेज इनबॉक्समधून बाजूला होऊन फिल्टर्ड मेसेजमध्ये दिसतील. यामुळे मेसेज वाचल्यानंतरही समोरच्या व्यक्तीला तुम्ही हा मेसेज वाचला आहे की नाही, हे कळणार नाही. मात्र अजून ग्रुप चॅटमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती