2014 मध्ये मार्क झुकरबर्गच्या फेसबुकने व्हॉट्स अॅप विकत घेतले होते. परंतु, व्हॉट्स अॅप यापुढेही स्वतंत्र कंपनी म्हणूनच काम करेल आणि त्यांच्या यूजर्सची माहिती त्यांच्याकडेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, 2016 मध्ये त्यांनी प्रायव्हसी पॉलिसी बदलली. यूजर्सच्या माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. या 'डेटा शेअरिंग'ला संमत्ती न दिसल्यास यूजर्सना व्हॉट्स अॅपचा वापरच करता येत नव्हता.