व्हॉट्सअॅपकडून टू-स्टेप व्हेरिफिकेशनचे नवं फीचर

शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (16:35 IST)
व्हॉट्सअॅपने  टू-स्टेप व्हेरिफिकेशन हे नवं फीचर रोल आऊट केलं आहे. अनेक महिने या फीचरसाठी काम सुरु होतं. त्यानंतर आता अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजच्या सर्व यूजर्ससाठी हे फिचर मिळणार आहे. या सिक्युरिटी फीचरच्या वापरासाठी यूजर्सला व्हॉईसअॅपच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सेटिंगच्या अकाउंटमध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करावं लागेल. हे फीचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर यूजर्सला याचा सहा आकडी पासकोड तयार करावा लागेल. तसेच सोबत तुमचा ईमेलही द्यावा लागेल. पासकोड विसरल्यास त्याच्या रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येई. या फिचरमुळे तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट आणखी सुरक्षित होईल. कारण की, तुमचा 6 आकडी पासकोड टाकल्याशिवाय कोणीही तुमचा नंबर अॅक्टिव्ह करु शकणार नाही.
 

वेबदुनिया वर वाचा