Twitter चे सह-संस्थापक इवान कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडतील

सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (11:08 IST)
ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इवान विलियम्स या महिन्याच्या शेवटी कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडणार आहेत. कंपनीने यू.एस. सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज कमिशनला याबद्दल माहिती दिली. विलियम्सने नोटिसमध्ये म्हटले, "'हे 13 वर्ष माझ्यासाठी फारच विलक्षण राहिले आणि मला यावर गर्व आहे की माझ्या कार्यकाळात ट्विटरने बरेच काही मिळविले आहे." विलियम्स इतर प्रकल्पांवर लक्ष देण्यासाठी ट्विटर सोडत आहे. 
 
महत्वाचे म्हणजे मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डॉर्सी 25 फेब्रुवारी रोजी सूचना प्रौद्योगिकी (आयटी)शी संबंधित संसदीय समिती समोर उपस्थित नाही होणार. त्यांच्या जागेवर ट्विटरचे लोक नीती प्रमुख कॉलिन क्रोवेल यांना पाठवले जाणार आहे. 
 
आयटीवर संसदीय समितीने ट्विटरचे प्रमुख जॅक डॉर्सीला 25 फेब्रुवारीला समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते आणि कंपनीच्या कनिष्ठ अधिकार्‍यांसोबत मीटिंग न करण्यास सांगितले होते. ही बैठक अशा वेळेस होत आहे जेव्हा देशात लोकांच्या डेटा सुरक्षा आणि सोशल मीडियाच्या माध्यमाने निवडणुकीत हस्तक्षेपांबद्दल काळजी वाढत आहे.  
 
ट्विटरच्या प्रवक्ताने ई-मेलद्वारे पाठविलेल्या वक्तव्यात सांगितले, "आम्ही सोशल मीडिया आणि ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्मवर नागरिकांच्या हक्कांच्या सुरक्षेवर ट्विटरचे विचार ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी संसदीय समितीचे आभार मानतो."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती