फेसबुकनंतर ट्विटरही केम्ब्रिज ऍनालिटीकासोबत डेटा स्कॅण्डलमध्ये अडकल्याचं समोर येत आहे. केम्ब्रिज ऍनालिटीकाने कोणत्याही परवानगीविना फेसबुकवरील 8.7 कोटी युजर्सचा डेटा चोरला होता.
फेसबुक डेटा लीक झाल्यानंतर युजर्सच्या प्रायव्हसीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना आता ट्विटरचा डेटाही सुरक्षित नसल्याची माहिती मिळत आहे. ट्विटरनेही केम्ब्रिज ऍनालिटीकाला युजर्सचा डेटा विकला आहे. द संडे टेलिग्राफने यासंबंधी वृत्त दिले आहे.