व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या यूजर्सना नवीन मेसेजिंग फीचर म्हणून 'एडिट' पर्याय देणार आहे. रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहे. तथापि, भविष्यातील अपडेटसह, ते iOS आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांना देखील ऑफर केले जाईल.
माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर वर या EDIT बटणाची आतुरतेने वाट बघत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या फीचरवर काम करत आहे. हे फीचर्स ट्विटर ब्लु युजर्स साठी आणले जाईल. त्यानंतर हे एडिट बटण फीचर्स इतर युजर्ससाठी रोलआउट केले जाईल. कंपनी ने 6 एप्रिल रोजी ट्विट करून या एडिट बटण फीचर्स येण्याचे जाहीर केले होते.