ERMAC 2.0 मालवेअर Android फोनसाठी जास्त धोकादायक आहे. एखाद्या युजरने जाणूनबुजून किंवा नकळत फसव्या अॅपद्वारे इन्स्टॉल केल्यावर त्याच्याकडून 43 प्रकार च्या परवानग्या मागवल्या जातात. जर वापरकर्त्यांनी या परवानग्या दिल्या, तर युजर्सच्या डिव्हाइसचे संपूर्ण नियंत्रण फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकते.
अॅप डाउनलोड केल्यानंतर बहुतेक वापरकर्ते या परवानग्या देतात. यामध्ये एसएमएस ऍक्सेस, कॉन्टॅक्ट ऍक्सेस, सिस्टम अलर्ट विंडो तयार करणे, ऑडिओ रेकॉर्डिंग, पूर्ण स्टोरेज वाचणे आणि डिव्हाइसवर लेखन ऍक्सेस समाविष्ट आहे.
सायबर सिक्युरिटी फर्मनुसार, हे अॅप नेहमी ऑफिशियल स्टोअर (Google Play Store) वरून इंस्टॉल करा. कोणत्याही तृतीय पक्षाच्या वेबसाइटवरून अॅप डाउनलोड करणे टाळा. प्ले स्टोअरवरून कोणतेही अज्ञात अॅप डाउनलोड करताना काळजी घ्या. अॅपचे पुनरावलोकन नक्की वाचा. मेसेज किंवा ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून अॅप डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे डिव्हाइस आणि अॅप नियमितपणे अपडेट करत रहा.