देशात ऑगस्ट पर्यंत 5G सेवा सुरू होण्याची शक्यता

सोमवार, 6 जून 2022 (16:15 IST)
काम करताना नेटवर्क स्लो होणं किंवा नेटवर्क होतं किंवा युट्युब ,फेसबुक पाहताना बफरिंगचा त्रास होण्यासारख्या समस्या आता लवकरच संपणार आहे. देशात ऑगस्टच्या अखेरीस 5 G इंटरनेट सेवा ग्राहकांना मिळणार आहे. असं दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले. या साठी आवश्यक असणाऱ्या स्पेक्ट्रमची विक्री देखील सुरु झाली असून ही प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

या संदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, लिलावाबाबत डिजिटल कम्युनिकेशन समितीशी संपर्क सुरु आहे. विभाग ट्रायच्या शिफारशींची वाट पाहत आहे. सरकारला 1 लाख mzh स्पेक्ट्रमचा 7.5 लाख कोटी रुपयांना लिलाव करण्याची शिफारस केली होती. त्याची वैधता 30 वर्षाची असणार. सध्या शासनास्तरावर प्रक्रिया सुरु असून लिलावानंतर 5 G लॉन्च करण्यात येईल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती