नवीन स्मार्टवॉच देईल गर्भधारणेची खुशखबर

पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी गर्भधारणेची चाचणी करण्याची पद्धत लवकरच इतिहासजमा होऊ शकते. शास्त्रज्ञांनी आता एक अनोखे स्मार्टवॉच तयार केले असून गर्भधारणा होताच, ते त्यासंबंधीची माहिती महिलांना देईल. स्वीत्झर्लंडमध्ये या स्मार्टवॉचची चाचणी सुरू झाली आहे.
 
एवा ब्रेसलेट नावाचे हे स्मार्टवॉच महिलांना त्यांची गर्भावसथा कधी सुरू होईल, हेच केवळ सांगणार नाही तर कोणत्या दिवसांत त्यांच्यासाठी गर्भावस्थेसाठी चांगला काळ आहे, याबाबतही माहिती देईल. शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच सध्या हार्डवेयरच्या मदतीने छोट्या-छोट्या शारीरिक परिवर्तनाच्या एका पॅकेजची ओळख केली आहे. आता ते एका अल्गोरिथमची निर्मिती करत असून ते या स्मार्टवॉचला ओळखणार्‍या व्यक्तिगत गुणांबाबत जाणू शकेल. या स्मार्टवॉचची किंमत 200 पौंड म्हणजे सुमारे 19 हजार रुपायापर्यंत असू शकते. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत वास्तविक चाचणीसाठी ते बाजारात उतरविण्याची अपेक्षा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहे.
 
या अध्ययनाचे प्रमुख व युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ज्युरिखचे प्राध्यापक मोहानेद शिलैह यांनी सांगितले की, एखादी महिला गर्भवती राहते तेव्हा तिच्या त्वचेचे तापमान, श्वास घेण्याचे प्रमाण व हृद्याचे ठोके बदलतात. दर मिनिटाला 2.1 ठोके हलतात, सोबतच त्वचेच्या तापमानात 0.2 अंशाचा बदल होतो. यातून महिलेची गर्भावस्था सुरू झाल्याचे संकेत मिळतात. सध्या गर्भधारणेची घरी चाचणी घेण्यासाठी महिलांना सकाळी मूत्र स्टिकमध्ये टाकावे लागते. ही स्टिक मूत्रातील मानवी कोरियोनिक गोनाडोट्रोपिनच्या पातळीवरुन महिलेने गर्भधारणा केली आहे की नाही ते सांगते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती