आता Google देणार लोन, भारतात लवकरच लॉन्च होणार Sachet प्रकल्प

गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (17:39 IST)
Google loan : इंटरनेट सर्च इंजिन Google ने भारतातील छोट्या व्यवसायांना मदत करण्यासाठी Google Pay ऍप्लिकेशनवर sachet loan (लहान कर्ज) जाहीर केले आहेत. गुगल इंडियाने सांगितले की, भारतातील व्यापाऱ्यांना अनेकदा लहान कर्जाची आवश्यकता असते. म्हणून, टेक दिग्गज Gpay ऍप्लिकेशनवर सॅशे लोन लॉन्च करेल. छोट्या व्यापाऱ्यांना लवकरच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. Google India ने सांगितले की कंपनी लहान व्यवसाय मालकांना ₹15,000 ची कर्जे देईल ज्याची परतफेड ₹111 च्या सुलभ रकमेमध्ये केली जाऊ शकते.
 
कर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन यूज करता येईल
व्यापार्‍यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा सोडवण्यासाठी Google Pay ने ई-पे लेटरसह भागीदारीत क्रेडिट लाइन तयार केली आहे. व्यापारी त्यांचा साठा आणि पुरवठा खरेदी करण्यासाठी सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन वितरकांवर त्याचा वापर करू शकतील. Google India ने ICICI बँकेच्या सहकार्याने UPI वर क्रेडिट लाइन सुरू केली आहे. Google India ने Axis Bank सोबत भागीदारी करून Google Pay वर वैयक्तिक कर्जाचा पोर्टफोलिओ देखील वाढवला आहे.
 
याशिवाय गुगल पेचे उपाध्यक्ष अंबरिश केघे म्हणाले की, गेल्या 12 महिन्यांत UPI द्वारे ₹१६७ लाख कोटी व्यवहार केले गेले. केंगे यांच्या म्हणण्यानुसार, ‘गुगल पेद्वारे निम्मी कर्जे 30,000 रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या कर्जदारांना वितरीत करण्यात आली होती, त्यापैकी बहुतांश टियर 2 शहरांतील आणि त्यापुढील आहेत’.
 
गुगल फॉर इंडियाच्या 9व्या आवृत्तीदरम्यान, कंपनीचे उपाध्यक्ष आणि देश प्रमुख संजय गुप्ता म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षेमध्ये प्रयत्न सुधारण्याची त्यांची योजना आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती