फोनमध्ये इंटरनेटशिवाय डेस्कटॉपवर WhatsApp चालवा, नवीन फीचरचे वैशिष्टये जाणून घ्या

सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:15 IST)
व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनवर लॉग इन करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वी युजर्सला  व्हाट्सएप वेबवर लॉग इन करण्यासाठी प्रायमरी फोनची आवश्यकता होती. यासोबतच प्रायमरी उपकरणात इंटरनेट चालणे आवश्यक होते. पण आता व्हॉट्सअॅपवर मल्टी-डिव्हाइस फीचर आल्याने हा त्रास संपला आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाईससाठी रिलीझ केले जात आहे.
 
नवीन फीचर आल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसले तरी तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट डेस्कटॉपवर सुरूच राहणार आहे.डेस्कटॉपला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असेल. यासाठी आपल्याला मल्टी-डिव्हाइस बीटा प्रोग्राम सक्रिय करणे आवश्यक आहे. ते सक्रिय करण्यासाठी, फोनवर व्हॉट्सअॅप उघडा आणि Linked Devices पर्यायावर जा. येथे तुम्हाला बीटा(Beta) प्रोग्राममध्ये सहभागी होण्याचा पर्याय मिळेल. 
 
आपल्याला फक्त मल्टी-डिव्हाइस वैशिष्ट्य निवडायचे आहे आणि तुम्हाला ज्या डिव्हाइसवर WhatsApp वेब वापरायचे आहे त्यावरील QR कोड स्कॅन करायचा आहे. यानंतर, आपण इच्छित असल्यास, आपण प्रायमरी फोनवरून इंटरनेट देखील बंद करू शकता आणि आपले व्हॉट्सअॅप वेब खाते चालू राहील. जोपर्यंत आपण  स्वतः त्या PC वरून लॉगआउट करत नाही तोपर्यंत आपले  WhatsApp खाते ब्राउझरवर दिसेल. नवीन वैशिष्ट्य Windows 10, Windows 11 आणि macOS वर चांगले काम करतो. 
 
या गोष्टींची काळजी घ्यावी -
लक्षात ठेवा की आपले व्हॉट्सअॅप वेब अकाउंट फक्त 14 दिवसांसाठी लॉग इन केले जाईल, त्यानंतर आपल्याला QR कोड पुन्हा स्कॅन करायचा आहे. हे वैशिष्ट्य Android डिव्हाइसवर चांगले कार्य करते, जरी iOS डिव्हाइससाठी काही मर्यादा आहेत. Android डिव्हाइसशी लिंक केलेले असताना, आपण वेब पोर्टलवरून संदेश आणि थ्रेड हटवू शकता. पण iOS च्या बाबतीत असे नाही. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती