जिओ ग्राहकांसाठी धक्का ; 31 मार्चपासून फ्री सेवा बंद

सोमवार, 8 जानेवारी 2018 (12:31 IST)
रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 4 जी इंटरनेटची मोफत सेवा पुरवली आहे. मात्र आता जिओ ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. नवनवे प्लॅन बाजारात आणत असतानाच दुसरीकडे मोफत सेवा वापरणार्‍या नेटकर्‍यांची जिओने निराशा केली आहे. येत्या 31 मार्चपासून रिलायन्स जिओ आपली मोफत सेवा बंद करणार आहे.
 
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 21 फेब्रुवारी 2017 ला 4 जी सेवा पुरवणारी जिओ प्राईम मेंबरशिप बाजारात आणली होती. या प्लॅन साठी मेंबरशिप घेण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख होती. मात्र कंपनीने मेंबरशिप होण्यासाठी ही तारीख वाढवून 15 एप्रिल 2017 केली. यांची वैधता 1 वर्षासाठी होती. या मेंबरधारकांची ही सेवा आता 31 मार्च रोजी बंद होणार आहे. त्याचबरोबर फ्री अ‍ॅप्सदेखील बंद होणार आहे.
 
मात्र नववर्षानिमित्त ग्राहकांसाठी जिओ ने हॅप्पी न्यू ईअर प्लॅनदेखील आणला आहे. या प्लॅनध्ये नेटकर्‍यांना दिवसा 1 जीबी डेटा असलेल्या प्लॅनच्या किंमतीत 50 ते 60 रूपयांनी कपात केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती