सचिन तेंडुलकरच्या मुलीला त्रास देणार्‍या अटक

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिला फोनवर त्रास देणार्‍या मुलाला पश्चिम बंगालच्या पूर्वी मिदनापुर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. 
 
पोलिसांप्रमाणे महीसादल पोलिस स्टेशन अंतर्गत देबकुंड गावातील रहिवासी देब कुमार मैती काही दिवसांपूर्वी आपल्या मोठ्या भावाला भेटायला मुंबई गेला होता आणि त्याने तिथे साराचा फोन नंबर मिळवून तिला फोन केला व लग्न करण्याची इच्छा जाहीर केली.
 
या संदर्भात मुंबईत तेंडुलकर कुटुंबाने प्रकरण नोंदवले परंतू मुंबई पोलिसाच्या सायबर सेलने पूर्ण प्रकरण गुप्त ठेवले. पश्चिम बंगाल पोलिसाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने हल्दियामध्ये सांगितले की मुंबई पोलिसाच्या एका समूहाने मैतीला अंदुलियाच्या जवळहून 
 
अटक केली आणि कोर्टात प्रस्तुत केले. कोर्टाने मैतीला तीन दिवसाच्या ट्रांजिट रिमांडवर मुंबई जाण्याची परवानगी दिली.
 
चौकशी करताना संबंधित व्यक्तीने आपला गुन्हा स्वीकार केला असून त्यांना हातावर साराच्या नावाचे टैटू बनवलेलेही दाखवले. तसेच मैतीच्या शेजारच्यांप्रमाणे तो वर्ष 2017 पासून मानसिक आजाराने त्रस्त आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती