आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये नवं फिचर, कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती

सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (08:30 IST)
आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे. ओपन एपीआय सर्व्हिस हे नवीन फिचर जोडण्यात आले आहे. यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचारी आणि इतर युजर्सच्या आरोग्याबद्दलची माहिती कोणत्याही गोपनीयतेचे उल्लंघन न करता मिळवता येणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत निवदेनात ही माहिती देण्यात आली आहे. तसेच आरोग्य सेतु जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अॅप असून याच्या यूजर्सची संख्या 15 कोटींवर गेली आहे.
 
या नव्या फिचरमुळे लोकांना, कंपन्या अथवा अर्थव्यवस्थेला सामान्य स्थितीत परत येण्यास मदत करेल. याचा हेतू कोरोनाची भीती कमी करणं हा आहे. देशातील अशा नोंदणीकृत संस्था आणि कंपन्या या सेवेचा लाभ घेण्यास सक्षम असतील, ज्यांची कर्मचारी संख्या 50 पेक्षा जास्त आहे. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती घेऊ शकतात. त्यासाठी संबंधित व्यक्तीकडून त्याच्या आरोग्याची माहिती, यूनिटकडून शेअर करण्याची परवानगी घ्यावी लागणार आहे.
 
इलेक्ट्रॉनीक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे फिचर कंपन्या किंवा अर्थव्यवस्थेला सुरक्षितपणे, सुलभ काम करण्यास मदत करेल. या फिचरमुळे आरोग्य सेतूची स्थिती किंवा आरोग्य सेतु यूजरचं नाव केवळ व्यक्तीच्या सहमतीनेच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा डेटा शेअर करण्यात येणार नाही. या सर्व्हिससाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती