व्हॉट्सअ‍ॅपने आणले नवे रिअॅक्शन फीचर,जाणून घ्या कसे वापरायचे?

शुक्रवार, 6 मे 2022 (14:08 IST)
व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर व्हॉट्सअ‍ॅप रिअॅक्शन फीचर आणले गेले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मालकीची कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून याबाबत माहिती दिली. झुकेरबर्गने सांगितले की, आजपासून म्हणजेच 5 मे 2022 पासून व्हॉट्सअ‍ॅप रिअॅक्शन फीचरचे रोलआउट सुरू झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने सुरुवातीला 6 इमोजी आणले आहेत. यामध्ये थंब्स-अप, हार्ट, हसणे, सरप्राईज, दुखी आणि थँक्स सारख्या इमोजींचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत काही नवीन इमोजी लॉन्च करण्यात येणार असल्याची घोषणा मार्क झुकरबर्गने केली आहे.
 
वास्तविक, नावाप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅप रिअॅक्शन फीचर तुम्हाला कोणत्याही चॅटवर इमोजीच्या मदतीने टेक्स्ट मेसेजशिवाय तुमची अभिव्यक्ती शेअर करण्याची परवानगी देते. फेसबुकवर असे फिचर आधीच अस्तित्वात आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीसह उत्तर देण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण अप इमोजीसह प्रतिक्रिया देण्याचे फीचर लाँच करण्यात आले आहे. त्यासाठी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये जाऊन इमोजी निवडण्याची गरज नाही. वापरकर्ते संदेशावर जास्त वेळ दाबून इमोजीसह प्रतिक्रिया देऊ शकतील.   
 
कसे वापरावे
* सर्व प्रथम व्हाट्सअँप अपडेट करा. अँड्रॉइड युजर्स गूगल प्ले स्टोअर वरून व्हॉट्सअ‍ॅप आणि ऍपल अँप स्टोअर वरून आयओएस युजर्स अपडेट करू शकतात.
* तुम्हाला ज्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटला उत्तर द्यायचे आहे ते उघडा.
* मग ती चॅट दाबा आणि धरून ठेवा. यानंतर एक पॉप-अप मेसेज येईल. 
* या मेसेजमध्ये अनेक प्रकारचे इमोजी असतील. तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचे असलेले इमोजी निवडा.
* पॉप-अप मेसेजमध्ये एकूण 6 इमोजी दिसतील. यापैकी एक निवडावा लागेल. ज्याचे रिप्लाय मेसेजच्या खालील बाजूस दिसेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती