अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी हे अॅप अधिक सोईस्कर असल्याचे सांगितले आहे. आम्ही वेगवेगळ्या धमण्यांवर लक्ष केंद्रित केले. आतील बाजूस वळणाऱ्या धमण्यांचीही अचूक माहिती या अॅपमुळे मिळू शकेल, असे संशोधक आनंद चंद्रशेखर यांनी सांगितले.
या अॅपमध्ये दोन संवेदक वापरण्यात आले आहेत. त्यामुळे रक्तदाबाची अचुकता मोजणे सहज शक्य झाले आहे. अॅप सुरू केल्यानंतर संवेदकावर बोट ठेवल्यास हृदयाची प्रक्रिया सुरुळीतपणे सुरू आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे, असे प्राध्यापक रामकृष्णा मुक्कमल यांनी स्पष्ट केले. आम्ही केलेल्या संशोधनानुसार ९० टक्के लोक या अॅपचा अगदी सहजपणे वापर करू शकतील, असे मुक्कमल म्हणाले.