सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (09:50 IST)
राज्याच्या राजकारणात नाट्कयमय घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी पार पडला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील जनतेची सुरूवात अश्या धक्कादायक बातमी झाली असली तरी जनतेची क्रिएटिव्हीटी संपलेली नाही. सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस पडला आहे. विशेष करून देवेद्र फडणवीस यांचा फोटो वापरून विदर्भाच्या स्टाईलमध्ये, मले तर लै म्हंजे लैच मजा येऊन राहीली न बाप्पा! हे मीम्स सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती