डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

गुरूवार, 22 मार्च 2018 (09:34 IST)

फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली आहे. युजर्सच्या माहितीची जबाबदारी आमची असल्याचेही त्याने म्हटले. डेटा लीक होणं हे विश्वासाला तडा जाण्यासारख असल्याचही त्याने म्हटलय. ५ कोटी युजर्सची माहिती लीक झाल्याचा आरोप 'ब्रिटीश डेटा विश्लेषण कंपनी' कॅम्ब्रिज एनालिटीका कंपनीवर आहे. राजकारण्यांच्या मदतीसाठी याचा उपयोग केला जातोय. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रेक्सिट अभियानात याचा उपयोग केला गेल्याचा आरोप करण्यात आला. 

२०१६ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुक अभियानासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने फेसबूकने ५ कोटी युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा डेटा पुरविल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुक आणि कॅंब्रिज एनालिटिका दोघांवरही युरोपीयन संघ, ब्रिटेनसहित अमेरिकेत कायदेशीर कारवाई सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती