जिओफाय हॉटस्पॉट डोंगलची किंमत 1,999 रुपये आहे. जर तुम्ही तुमचं जुनं राउटर किंवा डोंगल एक्सचेंज केलं तर तुम्हाला यामध्ये 2,010 रुपये किंमतीचा डेटा मिळेल. म्हणजेच तुमचं नवं राउटर फ्री असेल. देशात 600 ठिकाणी जिओच्या सिमची होम डिलिव्हरी सुरु आहे. आता कंपनीनं आपल्या हॉटस्पॉट डोंगलचीही होम डिलिव्हरी सुरु केली आहे. यासाठी तुम्हाला जिओच्या वेबसाइटवर जाऊन पिनकोड टाकावा लागेल. कारण त्यानुसार तुम्हाला ही डिलिव्हरी होऊ शकते की नाही हे समजणार आहे.