जियो यूजर्ससाठी एक मोठी खुशखबरी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना सब्सक्रिप्शनसाठी आता 15 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या अगोदर ही स्कीम 31 मार्च पर्यंतच होती, ज्याला आता कंपनीने वाढवून 15 एप्रिल केले आहे.
अर्थात जियोच्या ज्या यूजर्सने आतापर्यंत जियोची प्राइम मेंबरशिप घेतली नव्हती, ते आता 15 एप्रिलपर्यंत ही मेंबरशिप घेऊ शकतात. तसेच यूजर्सला जियो स्कीमचा फायदा उचलण्यासाठी कंपनीकडून निर्धारित टॅरिफ प्लानला देखील रिचार्ज करावे लागणार आहे.