वाढवा इंटनेट स्पीड!

शनिवार, 14 जानेवारी 2017 (11:54 IST)
इंटरनेटचा स्पीड कमी होण्याची अनेक कारणं असतात. कधी सर्व्हिस प्रोव्हायडरची चूक असते तर कधी आपल्या डिव्हाइसचा प्रॉब्लेम असतो. अशा वेळी काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही इंटरनेट स्पीड वाढवू शकता. 
 
* पीसीच्या 'डिव्हाइस मॅनेजर' मध्ये जा. विंडोज 7 किंवा त्यापुढचं व्हर्जन असेल तर सर्च बारमध्ये हा ऑप्शन मिळेल. 
 
* यात तुम्हाला 'पोर्टस' या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. 
 
* इंटरनेट केबल कनेक्ट केलेा पोर्ट तुम्हाला निवडायचा आहे. त्यावर क्लिक केल्यावर सेटिंग्जचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा. 
 
* आता 'बीट्स पर सेकंड' मॅक्झिमम करा. सेटिंग सेव्ह करून पीसी रिबूट करा. 
 
* तुमचा इंटरनेट स्पीड वाढलेला असेल. 

वेबदुनिया वर वाचा