भारतीय लष्कराकडून ८९ ऍप्स बॅन करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने आपल्या जवानांना आणि कर्मचाऱ्यांना ८९ ऍप्समधील सर्व ऍप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. मेसेजिंग प्लॅटफॉर्म, वेब ब्राउझर, कंटेंट शेयरिंग, गेमिंग इत्यादीवरील सेवेवर सैन्याने बंदी घातली आहे. ज्यामध्ये फेसबुक, टिकटॉक, ट्रूकॉलर (Truecaller), इंस्टाग्राम (Instagram), यूसी ब्राउजर, PUBG इत्यादी ऍप्सचा समावेश आहे.
जवानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय या निर्णयाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. १५ जुलै पर्यंत ८९ ऍप्स आपल्या स्मार्ट फोनमधून काढून टाकण्याचे आदेश भारतीय लष्कराने जवानांना दिला आहे.