आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच आधार कार्डची गरज पडते आणि आम्हाला ऑनलाईन आधार काढायचा असतो पण त्यात मोबाइल नंबर बदललेला असतो. तर चला आज आम्ही तुम्हाला आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलण्याची पद्धत सांगत आहोत.
जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या आपल्या आधार कार्डात मोबाइल नंबर बदलायचा असेल तर विसरून जा, कारण हे शक्य नाही आहे. तुम्ही स्वत:हून आधार कार्डात मोबाइल नंबर अपडेट नाही करू शकत. आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट फक्त आधार सेंटरवर जाऊनच होतो. तर आता प्रश्न असा येतो की तुमच्या घराजवळच्या आधार सेंटरची माहिती तुम्हाला कशी मिळेल. तर जाणून घ्या ....
या सेक्शनमध्ये Update Aadhaar at Enrolment/Update Center च्या विकल्पाला तुम्ही क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक विंडो उघडेल ज्यात आधार सेंटर सर्च करण्यासाठी state, postal pin code आणि search box चे विकल्प दिसतील.
त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार विकल्पाची निवड करून आधार सेंटरवर जाऊ शकता. तेथे गेल्यानंतर तुमच्या आधाराचा ऑथेंटिकेशन होईल आणि तुमच्याकडून आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलण्याचे आवेदन घेण्यात येईल. आवेदन केल्यानंतर काही दिवसात तुमच्या आधारामध्ये नवीन मोबाइल नंबर अपडेट होऊन जाईल. तुम्ही https://resident.uidai.gov.in/check-aadhaar-status वर जाऊन देखील अपडेटचे स्टेटस चेक करू शकता.