अम्लपित्त वाढले असता ऊस खावे अथवा उसाचा रस प्यावा. त्यामुळे त्वरित पोट साफ होते. तसेच ऊस जेवणापूर्वी खाल्ल्यास पित्त वाढ होत नाही.
आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्यासोबत घ्यावा. यामुळे त्वरित घसा साफ होतो.
कावीळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चावून खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास उसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालू होऊन रुग्ण बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २0 ग्रॅम खडीसाखर घालून घेतल्याससुद्धा कावीळ बरा होतो.
सतत कान फुटत असल्यास उसाचे कांडे गरम करून, नंतर त्याचा रस काढून दोन- तीन चमचे कानात पिळल्यास कान फुटणे कायमचे बंद होते.