गुगल होम मिनीच्या तुलनेत गुगल नेस्ट मिनीतील काही डिजाइन व स्पेसिफिकेशनमध्ये बदल केले आहेत. तसंच, पॉवर कनेक्टर आणि केबल दिली आहे. गुगल नेस्टचं डिजाइन गुगल होम मिनीशी काही प्रमाणात मिळतं जुळतं आहे. नव्या डिजाइनमध्ये मायक्रोफोन स्लायडर स्विच आणि फॅब्रिक टॉप कव्हरच खाली लाइट्स देण्यात आल्या आहेत. नेस्ट मिनीच्या स्पीकरचा आवाज इतर स्पीकरपेक्षा अधिक चांगला असल्याचा दावा गुगलनं केला आहे. यासाठी डिव्हाइसमध्ये डेडिकेटेड मशीन लर्निंग चिप बसवण्यात आली आहे.
गुगलचे हे स्पीकर भारतात चॉक आणि चारकोल या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे भारतातील सर्वात प्रमुख म्युझिक सर्व्हिसना सपोर्ट करतात. नेस्ट मिनीची किंमत 4,499 रुपये आहे. गुगल नेस्ट मिनी स्पीकर फ्लिपकार्टवरून ग्राहक खरेदी करु शकतात.