Whatsapp ने नवीन अँड्रॉईड बीटा अपडेट जारी केली आहे, ज्यात डिझाईनमध्ये काही बदल दिसून येत आहेत. शिवाय एक बगही दुरुस्त केला आहे. नवीन अपडेट बीटा व्हर्जनच्या 2.19.328 मध्ये देण्यात आली आहे. लवकरच सर्व युझर्सना ही अपडेट मिळणार आहे. काही वृत्तांनुसार, Whatsapp चा कॅमेरा आयकॉनही बदलणार आहे, जो आतापर्यंत इंस्टाग्रामच्या लोगोसारखा दिसत होता.
Whatsapp चे मेसेज काही काळासाठी गायब करता येणार
WBetainfo च्या रिपोर्टनुसार, Whatsapp चा नवीन कॅमेरा आयकॉन स्टेटस टॅबमध्ये पाहिला जाऊ शकतो. याशिवाय चॅट बारमध्येही कॅमेरा आयकॉन बदलणार आहे. हा कॅमेरा आयकॉन अगोदर इंस्टाग्रामसारखाच दिसत होता. पण हा आयकॉन नव्या रुपात आता कॅमेर्यासारखा दिसणार आहे.
यापूर्वी Whatsapp ने डार्क मोड आणि पहिल्यापेक्षा जास्त Group invite यांसारखे फीचर्स जारी केले होते. यूजर्सला कोणत्या ग्रुपमध्ये कुणी dd करावं याची निवड आता यूजर्सलाच देण्यात आली आहे. यूजर्सना कोणत्याही ग्रुपध्ये dd केलं जात होतं, ज्यामुळे प्रायव्हसीचा धोका तर होताच, मात्र काही आक्षेपार्ह आणि साजात तेढ निर्माण करणार्या ग्रुपवर कायदेशीर कारवाईच्या घटनाही घडल्या आहेत.