गुगलने ‘बग’ शोधण्यासाठी बक्षीसमध्ये केली वाढ

बुधवार, 7 जून 2017 (11:17 IST)

आता गुगलनं अँड्रॉईड ओएसमधून ‘बग’ शोधणाऱ्यांना बक्षीस म्हणून दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ केली आहे. त्यामुळे आता बक्षीसाची रक्कम तब्बल 2 लाख डॉलर करण्यात आली आहे. प्ले स्टोअरमध्ये जवळजवळ डझनभर मालवेअर असलेले अॅप आढळून आले आहेत. आतापर्यंत 45 लाख ते 1.85 कोटी जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहेत. मालवेअर असलेले अॅप मागील अनेक वर्षापासून प्ले स्टोअरवर असल्याचं समजतं आहे. जुन्या अँड्रॉईड ओएस असणाऱ्या मोबाइलमध्ये मालवेअरनं शिरकाव केला आहे. अँड्रॉईडचं नवं व्हर्जन सुरक्षित आहे. जे ऑपरेटिंग सिस्टम गुगलनं काही वर्षापूर्वी विकसित केले होते त्यांना सध्या धोका आहे. त्यामुळे आतापर्यंत गुगलच्या नव्या अँड्रॉईडमध्ये कोणताही बग शोधता आलेला नाही. त्यामुळेच कंपनीनं आपल्या ओएसला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आणि जास्तीत रिसर्चर किंवा इंजिनिअर यांनी सहभागी होण्यासाठी बक्षीसाच्या रक्कमेत वाढ केली आहे.

वेबदुनिया वर वाचा