आतापर्यंत तुम्हाला यूट्यूबवर पूर्ण चित्रपट बघण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. दोन ऑप्शन मिळतात, या तर तुम्ही चित्रपट रेन्टवर बघू शकता किंवा त्याला विकत घेऊ शकता. पण काही चित्रपट तुम्ही फ्री देखील बघू शकता.
द वर्जच्या रिपोर्टनुसार यूट्यूबवर फ्री मिळणार्या चित्रपटांमध्ये पॉप एड्स दिसतील जे चित्रपटाच्या दरम्यान सतत काही काही वेळेने दिसत राहतील. या फीचरला कंपनीने ऑक्टोबरमध्येच सुरू केले होते, पण हे मागील आठवड्यापासून दाखवण्यात येत आहे.
कॅलिफोर्निया बेस्ड कंपनीने हॉलिवूड स्टुडियोजसोबत पार्टनरशिप केली आहे. या लिस्टमध्ये 100 चित्रपट आहे. येणार्या काळात अजून चित्रपट सामील करण्यात येतील. यात द टर्मिनेटर, हॅकर्स, सेव्ड आणि रॉकी सिरींजचे चित्रपट सामील आहे. या लिस्टमध्ये बॉलीवूडचे चित्रपट नाही आहे, पण येणार्या वेळेस बॉलीवूडचे चित्रपट देखील येऊ शकतात. कंपनीने अद्याप याबद्दल काही बयान दिलेले नाही.