फेसबुकच्या ८७ दशलक्ष वापरकर्त्यांची कोणती माहिती केंब्रिज अॅनॅलिटिकाने घेतली, याचा तपशील आजपासून त्यांना न्यूजफीडमध्ये मिळण्यास सुरूवात होणार आहे. त्यांना त्यात सविस्तर संदेश मिळेल. एकूण २.२ अब्ज फेसबुक खातेदारांना आजपासून नोटीस येण्यास सुरूवात होईल, त्याचे नाव ‘प्रोटेक्टिंग युवर इनफॉर्मेशन’असे आहे. त्यात एक लिंक दिली जाईल त्यात कोणते अॅप्स ते वापरतात व कोणती माहिती त्यांनी शेअर केली याची माहिती दिली जाणार आहे. जर वापरकर्त्यांना वाटले तर त्यांनी संबंधित अॅप बंद करावीत किंवा त्रयस्थ अॅप प्रवेश बंद करावा. तो प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय राहील.