Digital Payment च्या नियमात 1 एप्रिलपासून बदल, जाणून घ्या माहिती

बुधवार, 31 मार्च 2021 (15:41 IST)
1 एप्रिलपासून डिजिटल पेमेंटच्या नियमात बदल होत आहे. त्यामुळे आता कोणतीही बिलं ऑटोमेटिक भरली जाणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑटो डेबिट पेमेंटच्या सेवेसाठी ‘अ‍ॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’चा पर्याय आणल्यामुळे दरमहा परस्पर ग्राहकांच्या बँक खात्यामधून ठराविक पैसे कापले जाणार नाही.
 
1 एप्रिल नंतर कोणतीही बिलं आपोआप भरली जाणार नाही. कारण  दरमहा शुल्क आकारण्यासाठी राबविण्यात येणारी ‘ऑटो डेबिट’ प्रणाली बंद होणार आहे. रिझर्व्ह बँकेने या नियमात बदल केल्याने ग्राहकांना नक्कीच होणार आहे.  ‘ऑटो डेबिट’ प्रणालीवर ‘अ‍ॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’चा नवीन पर्याय सुरू करणार असल्याचं आरबीआयने यापूर्वी नमूद केलं होतं. 
 
नवीन नियमावली
नवीन नियमावलीनुसार 1 एप्रिलपासून बँका ऑटो डेबिट पेमेंटच्या निर्धारित तारखेच्या पाच दिवस आधी ग्राहकांना संदेश पाठवले जातील. संबंधित पेमेंट करण्याबाबद ग्राहकाकडून परवानगी मिळाल्यानंतरच ती रक्कम खात्यातून वजा होईल. याशिवाय बिलाची रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास बँकेकडून ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ‘ओटीपी’ पाठवावा लागेल.
 
1 एप्रिलपासून नवा नियम लागू होणार आहे. तरी पेमेंट सुविधा देणाऱ्या बँका आणि इतर प्लॅटफॉर्म्स यासाठी अतिरिक्त वेळेची मागणी करत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती