अबब! एक लाख हिरे जडलेला हेडफोन

ओंक्यो या कंपनीने नवीन हिरेजडित हेडफोन लाँच केला आहे. या विशेष हिरेजडित हेडफोनची किंमत एक लाख डॉलर्स इतकी आहे. अर्थातच ही सामान्य माणसाला वापरण्यासाठी बनवलेली वस्तू नाही. उच्चभ्रू लोकांसाठी एक स्टेटमेंट म्हणून वापरायला या हेडफोनची निर्मिती करण्यात आली आहे.
 
या हेडफोनमध्ये वापरण्यात आलेले हिरे स्फटिक किंवा काच नसून ते असली हिरे आहेत. खरेदीदाराची आवड लक्षात घेऊन प्रत्येक हेडफोन तयार करण्यात आला आहे. डिझाईन व हिऱ्यांच्या आकारावरून हेडफोनची किंमत ८० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत आहे. 
 
या प्रत्येक हेडफोनसाठी २० कॅरेटच्या हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. सामान्यतः हेडफोनच्या उजव्या कानावर लाल रिंग असते. या अप्रतिम हेडफोनची प्रतिमा कायम राखत उजव्या कानावर माणिकांपासून लाल रिंग तयार केली आहे. इतर भाग स्टेनलेस स्टील व पांढऱ्या लेदरने बनवलेले आहेत.  
 
यासोबतच ३.५ मिलीमिटरचा कॉर्डदेखील हिऱ्याने सजवलेला आहे. हे हिरे बटणचे काम करतात. या हेडफोनची साउंड क्वालिटी किती चांगली आहे हे जरी कळले नसले तरी हेडफोन विकत घ्यायची तुमची तयारी असूनही तुम्हाला हेडफोन मिळतील की नाही याची शाश्वती नाही कारण त्यासाठी आधीच मोठी वेटिंग लिस्ट आहे.  

वेबदुनिया वर वाचा