अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये CCleaner हे झाले आहे हॅक

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (14:00 IST)

सर्वात प्रसिद्ध असलेले आणि बहुतांश अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये CCleaner  हे अॅप हे सर्व वापरत आहेत. आपल्या देशात हे तर  अॅप स्मार्टफोनशिवाय कम्प्युटरवर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आहे.मात्र वाईट बातमी आहे.  हे अॅप  तुम्ही  वापरत असाल तर तात्काळ हे अॅप Uninstall करा आणि मोबाईल पुन्हा एकदा व्हायरस मुक्त करवून घ्या कारण हे अॅप हॅक झालं आहे. हॅकर्सनी CCleaner ची सिक्युरिटी तोडून यामध्ये व्हायरस टाकला आहे. आता हा व्हायरस कोट्यवधी युजर्सच्या डिव्हाइसमध्ये पोहोचून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल खराब होईल तुमची माहिती इतर ठिकाणी पोहचवली जाईल, असे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आत्ताच हा  अॅप  मोबाईल मधून काढून टाकणे गरजेचे होणार आहे. जर तसे केले नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.CCleaner सॉफ्यवेअर 2 अब्ज युजर्सनी आतापर्यंत डाऊनलोड केलं आहे. CCleaner हे एक क्लिनिंग अॅप आहे. याद्वारे स्मार्टफोन आणि कम्प्युटरमधील अनावश्यक किंवा जंक फाइल क्लीन केल्या जातात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती