पेटीएम सोबत बिजनेस करा, पैसे कमवा

पेटीएमसोबत बिजनेस करण्यासाठी पेटीएमचे सेलर बनून त्यातून चांगली कमाई करता येणार आहे. आता  पेटीएम सुमारे ८ लाख लोकांपर्यंत पोहचलेले आहे. त्यामुळे पेटीएमशी जोडले गेल्यास  प्रॉडक्ट ८ कोटी युजर्सपर्यंत पोहचतील. पेटीएम चे सेलर होण्यासाठी  कोणतीही गुंतवणूक करायची नाही आहे. त्याचबरोबर पेटीएम यासाठी कोणताही चार्ज घेत नाही.  फक्त पेटीएमच्या अॅप किंवा वेबसाईटवर साईन अप करायचे आहे. आणि  प्रॉड्क्ट किंवा सर्व्हिसचे कॅटलॉग अपलोड करायचे आहे. त्यानंतर  प्रॉडक्टची विक्री सुरू करु शकता.
 
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पेटीएमने  पेमेंट बॅंक सुरु केली आहे. ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठई पेटीएम पेमेंट बॅंक देशभरात एजेंट बनवत आहेत. या पेटीएम एजेंट्सना पेमेंट बॅंक बीसी एजेंटचे नाव देण्यात आले आहे. या एजेंट्सचे काम पेटीएम प्रॉड्क्स विकण्याचे असेल. याबदल्यात आकर्षक कमिशन मिळणार आहे. 
 
एजेंट होण्यासाठी कोणतीही मोठी गुंतवणूक करायची नाही आहे. या कामासाठी फक्त काही कॅश, अॅनरॉईड स्मार्टफोन, बायोमेट्रीक डिव्हाईस यांची गरज आहे. त्यानंतर तुम्ही एजेंट म्हणून पेटीएमसाठी काम सुरु करु शकता. यासाठीची पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तर   https://paytm.com/offer/bc-faqs/  तर पेटीएमचे पार्टनर होण्याची इच्छा असल्यास या https://paytm.com/about-us/partner-with-us-2/ लिंकवर क्लिक करुन तुमची माहिती शेअर करा. त्यानंतर  रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर  पार्टनर म्हणून काम सुरु करु येईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती