या प्लानसाठी कंपनी ब्रॉडबँड युजर्सकडून एक रुपयाही आकारत नाही. फ्री-ऑफ-कॉस्ट Work@Home प्लासाठी डिपॉझिट किंवा इंस्टॉलेशन चार्ज देण्याचीही गरज नाही. पण ही ऑफर आधीपासून बीएसएनएल ब्रॉडबँडचे ग्राहक असलेल्यांनाच लागू आहे. हे ग्राहक केवळ 1800-345-1504 या नंबरवर फोन लावून ग्राहक या शानदार ऑफरचा लाभ घेवू शकतात.
5 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतरही कंपनीने एफयूपी मर्यादा ठेवलेली नाही. बीएसएनएलच्या या प्लॅनचा फायदा सध्या लँडलाइन कनेक्शन असलेल्यांनाच मिळेल. नवीन कनेक्शन घेणाऱ्या युजर्सना याचा फायदा मिळणार नाही’, असे बीएसएनएलकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.