Apple च नवं घड्याळ रक्तामधील ऑक्सिजनची पातळी सांगणार, जाणून घ्या किंमत

गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (17:05 IST)
आघाडी तंत्रज्ञान कंपनी अॅप्पलने अॅप्पल वॉच सिरीज -6 सादर केले आहे. ही घड्याळ रक्तातील ऑक्सिजनची पातळी सांगणार. याची किंमत सुमारे 399 डॉलर (सुमारे 29376 रुपये) पासून सुरू होणार. या शिवाय कमी किमतीत अॅप्पल वॉच एस ई देखील प्रक्षेपित केली आहे. याची किंमत सुमारे 279 डॉलर (सुमारे 20541रुपये) आहे. भारतात ही घड्याळ कधी पासून मिळणार याची अद्याप घोषणा केलेली नाही. 
 
अॅप्पलने आपल्या नव्या उत्पादनांची घोषणा कॅलिफोर्नियाच्या क्यूपार्टिनोमध्ये एका कार्यक्रमात केली. अॅप्पलच्या सीईओ ने याला प्रक्षेपित केले. अॅप्पल वॉच शृंखला -6 ची एक खास गोष्ट म्हणजे त्याचा रंग आहे. याचे तीन रंग उपलब्ध असणार. यामध्ये नवे एस 6 प्रोसेसर लावण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ही नवीन घड्याळ अॅप्पल वॉचच्या तुलनेत 20 टक्के वेगवान आहे. 
 
ऑक्सिजनची पातळी कमी होणं हे कोरोना व्हायरसच्या लक्षणापैकी एक आहे. या कारणामुळे डॉक्टर वेळोवेळी रुग्णाला त्याची ऑक्सिजनची पातळी तपासत राहण्याचा सल्ला देतात. जेणे करून रुग्णाची स्थितीचा अचूक अंदाज लावता येईल.
 
अॅप्पल वॉच शृंखलेत-6 हृदयाच्या ठोक्यांकडे देखील लक्ष ठेवते आणि यामध्ये पल्स ऑक्सिमीटरचे पर्याय देखील दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती