लॅपटॉप, अन्य उपकरण शोधणे झाले सोपे

गुरूवार, 7 जून 2018 (15:34 IST)
डिजीटेक कंपनीने ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे नवं गॅजेट लॉन्च केलं आहे. ५९५ रुपयांच्या या गॅजेटच्या सहाय्याने केवळ लॅपटॉपच नाही तर हरवलेल्या कार, सायकल किंवा अन्य अनेक वस्तू शोधणं अगदी सहजसोपं होणार आहे. या गॅजेटचा वापर करण्यासाठी केवळ ‘डिजीटेक ट्रॅकर’नावाचं एक अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. प्ले स्टोअरवर आणि अॅपल स्टोअरवर हे अॅप सहज उपलब्ध आहे. कमाल ३० मीटरपर्यंतच्या रेंजमध्ये हे गॅजेट काम करतं.
 
‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे तीन डिझाइनमध्ये आणि दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे गॅजेट ‘डिजीटेक ट्रॅकर’या अॅपसोबत पेअर केल्यानंतर कोणत्याही वस्तूवर लावून त्याचा वापर करता येईल. गॅजेटला ब्ल्यूटुथची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. त्यामुळे अॅपद्वारे हे गॅजेट किती अंतरावर आहे, याची माहिती सहज मिळेल. गॅजेटसोबत एक्स्ट्रा बॅटरी देखील देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती