Android Apps: हे 8 अॅप असू शकतात 'धोकादायक' अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्स त्वरा डिलीट करा

शुक्रवार, 22 जुलै 2022 (12:27 IST)
अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सना पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अँड्रॉइड युजर्सना 8 धोकादायक अॅप्सबद्दल चेतावणी देण्यात आली, मात्र, गुगलने वेळीच हे अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले.  मात्र, ज्यांनी हे अॅप डाऊनलोड केले होते अशा अनेक युजर्सच्या मोबाईलमध्ये अजूनही हे अॅप्स असू शकतात. याशिवाय या अॅप्सच्या एपीके व्हर्जन्सही गुगलवर उपलब्ध आहेत. फ्रेंच संशोधक मॅक्सिम इंग्राओ यांनी याबाबतचा इशारा दिला आहे. हे अॅप्स धोकादायक असल्याने तुमच्या फोनमधील वैयक्तिक डेटा आणि इतर तपशील चोरू शकतात. यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते. 
 
मालवेअर ऑटोलिकोस
फ्रेंच सुरक्षा संशोधक मॅक्सिम इंग्राओ यांनी सर्वप्रथम 8 धोकादायक अ‍ॅप्सची सूचना दिली. या अ‍ॅप्समध्ये नवीन प्रकारचा मालवेअर लपलेला आहे. त्यांनी या मालवेअरला ऑटोलिकोस असे नाव दिले आहे.
 
हे आहेत 8 धोकादायक अ‍ॅप्स 
1 ब्लाॅग स्टार व्हिडिओ एडिटरअॅप-1 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.
2 क्रिएटिव्ह 3डी लाॅंचर- ते लाखो वेळा डाउनलोडही झाले आहे 
3 फनी कॅमेरा- नावाप्रमाणेच हे कॅमेरा अॅप कॅमेरा फिल्टर्स देते. हे 5 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. 
4 वाव ब्यूटी कॅमेरा-वॉव ब्युटी कॅमेरा अॅपही फोनमधून काढून टाका. ब्युटी फिल्टरसह येणारे हे दुसरे कॅमेरा अॅप देखील आहे. हे 1 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे.
5 जीआयएफ इमोजी कीबोर्ड.
6 रेझर कीबोर्ड आणि थीम.
7 फ्रीग्लो कॅमेरा 1.0.0
8 कोको कॅमेरा व्ही 1. 1
 
हे सर्व धोकादायक अँप्स आहेत. युजर्स ने त्वरा आपल्या फोनमधून हे काढून टाकावे. जर तुमच्या फोनमध्ये यापैकी कोणतेही अॅप्लिकेशन डाउनलोड केलेले नसेल तर याचा अर्थ तुमच्या फोनला या मालवेअरचा धोका नाही. म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती